राजकीय दबावामुळे पञकारांवर हल्ला करणारे मोकाटच
पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड शहरात सिद्धांत समाचार या दैनिक वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक तसेच रफ्तार बुलेटिनचे मुख्यसंपादक संतलाल यादव यांच्यावर काळेवाडी येथे गुडांनी प्राणघातक हल्ला केला होता. तसेच, जिवे मारण्याची धमकी देत घरावर दगडफेक केली. याप्रकरणी पोलिसांनी अकरा जणांवर गुन्हा दाखल केला असून, यातील चार जणांना अटक केली आहे.
याप्रकरणी पत्रकार संतलाल रोशनलाल यादव (रा. सहकार कॉलनी, जोतिबानगर, काळेवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण नढे, नवनाथ नढे, संतोष काळे, खंडू कांबळे,सनी यादव (सर्व रा. काळेवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. महेश नढे, दशरथ नढे, दत्ता यांच्यासह अन्य आरोपी फरारी आहेत.
दरम्यान, या फरार आरोपींना तत्काल अटक करावी यासाठी पञकारांचे एक शिष्टमंडळ पिंपरी-चिंचवड पोलीस कमिशनर यांना भेटण्यासाठी गेले होते. ‘यावेळी कमिश्नर यांनी फरार आरोपींना अटक केली जाईल तसेच त्यांना शिक्षा देखील केली जाईल. असा आदेशच या प्रकरणातील तपास करणाऱ्या पोलीसांना दिला. मात्र पोलिस कमिश्नर यांच्या आदेशाची अंमलबजावणी संबंधित पोलीस करीत नाहीत यामुळे राजकीय दबावामुळे ते या फरार आरोपींना पाठिशी घालतात का? अशीच चर्चा सर्वसामान्य नागरिकांना आणि पञकारांना पडला आहे.