नवनिर्वाचित आमदार अण्णा बनसोडे यांच्यापासून माझ्या कुटुंबाच्या जिवाला धोका सुरेश निकाळजे यांनी घेतली पोलीसात धाव
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार अण्णा बनसोडे, श्रीचंद आसवाणी, अनिल आसवाणी, हिरानंद उर्फ डब्बु आसवाणी, विशाल शांताराम कांबळे यांच्या पासुन मला व माझ्या कुंटुबास जिवास धोका असल्याचे पञ आरपीआय पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी पिंपरी पोलीस आयुक्तांना दिले आहे या पञात त्यांनी आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गभीर आरोप करत पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी देखील केली आहे.
निकाळजे यांनी निवेदनात म्हटले आहे की पिंपरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार अन्ना बनसोडे ,श्रीचंद आसवाणी ,अनिल आसवाणी, डब्बु आसवाणी, विशाल शांताराम कांबळे यांनी विधानसभेतील प्रचाराचा राग मनात धरून मला व माझ्या कुंटूबाला जिवे ठार मारण्याचा कट आखत आहेत.महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष हा महायुती चा घटक पक्ष असल्याने व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशाने मी रिपाई शहाराध्यक्ष या नात्याने पिंपरी, चिंचवड,व भोसरी या मतदारसंघात महायुती चे उमेदवार पिंपरी गौतम चाबुकस्वार,चिंचवड लक्ष्मणभाऊ जगताप,भोसरी महेशदादा लांडगे यांचा पक्षाच्या वतिने प्रचार केला पिंपरी विधानसभेत गौतम चाबुकस्वार यांनचा प्रचार प्रामाणिकपणे केला व राष्ट्रवादीचे उमेदवार अन्ना बनसोडे व त्यांच्या समर्थकांना पैसे चे वाटप करत असताना रोखले व निवडणुक आयोगा च्या CVIGIL या अॅप वर रितसर तक्रार केली याचाच राग मनात धरून मला व माझ्या कुटुंबाला आमदार अन्ना बनसोडे, श्रीचंद आसवाणी,अनिस आसवाणी, डब्बु आसवाणी, विशाल कांबळे यांच्या पासुन मला माझ्या कुटूंबाला जिवाचा धोका निर्माण झाला आहे .
मी एका राजकिय पक्षाचा जबाबदार शहराध्यक्ष असुन माझे सामाजिक व राजकिय चळवळीत शहरात चांगले योगदान आहे.तरी मेहरबान साहेबांनी मला व माझ्या कुटुंबास या वरील व्यक्ती पासुन संरक्षण द्यावे व पुढील भविष्य काळात मला व माझ्या कुटुंबा चे जिवास काही बरे वाईट झाल्यास त्यास पुर्णपणे आमदार आन्ना बनसोडे,श्रीचंद आसवाणी,अनिल आसवाणी, डब्बु आसवाणी, विशाल शांताराम कांबळे यांनाच जबाबदार धरावे व मला आणि माझ्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे हि नम्र विनंती
सोबत मला धमकी दिलेली वाॅट्सअप चे Sreenshot व निवडणुक आयोगाचे Cvigil अॅप च्या तक्रारीचे Screenshot जोडत आहे