‘ तुला कोरोना होईल ‘ असे म्हणत दिघी पोलीस ठाण्यात दारू पिऊन पोलिसाचा धिंगाणा
भोसरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडच्या दिघी पोलिस ठाण्यात दारु पिऊन एका पोलिस कर्मचा – याने महिला पोलिस कर्मचारीला शिवीगाळ करीत दोन ते तीन तास धिंगाणा पोलीस ठाण्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .
मारुती हरिभाऊ बढेकर असे धिंगाणा घातलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे .
याप्रकरणी महिला पोलिसाने फिर्याद दिली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री फिर्यादी यांची दिघी पोलीस ठाण्यात अंमलदार म्हणून ड्युटी होती . तर मारुती बढेकर चहोली परिसरात गस्त घालण्याची ड्युटी देण्यात आली होती . आरोपी ड्युटीचे नेमून दिलेले ठिकाण सोडून दारू पिऊन पोलिस ठाण्यात आला . फिर्यादीशी बाचाबाची करीत शिविगाळ केली . ‘ तुला कोरोना होईल ‘ असे म्हणत अश्लील शब्द वापरून धिंगाणा घातला . पोलिस ठाण्यात दोन ते तीन तास हा धिंगाणा सुरु होता . याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरु आहे .