क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

आरोपींच्या निशाण्यावर दत्ता साने , पोलिसांच्या तपासाची दिशा चुकीच्या मार्गाने?

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांच्या चिखली येथील कार्यालयाची शुक्रवार दि. ७ रोजी काही अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड करून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आता यातील दोन आरोपींना भोसरी पोलीसांनी अटक केली आहे. कार्यालयातील कर्मचा-यांसोबत झालेल्या भांडणातून हा प्रकार झाला असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मात्र दत्ता सानेे यांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करत तपासाची दिशा ही चुकीच्या दिशेने जात असल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यांनी पोलिसांच्या तपासाची दिशाही चुकीच्या मार्गाने जात असल्याचे वाटत आहे. असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले त्यांच्या या कार्यालयांमध्ये वीज बिल भरणा केंद्र असल्यामुळे मुलीच येथे कर्मचारी म्हणून काम करतात. आणि त्यांच्या वादावरून सदर घटना घडणे हे अशक्य आहे.

त्यांनी असे सांगितले आहे की त्यांच्या सूत्रांकडून त्यांना असे समजले की हल्लेखोरांचा दत्ता साने यांनाच मारण्याचा कट होता. परंतु सदर कार्यालयात ते नसल्याने त्यांचा तो कट फसला आहे. साने यांनी पोलिसांकडे अशी विनंती केली आहे की, योग्य दिशेने तपासाची सूत्रे फिरवावी व आरोपींना लवकरात लवकर अटक करावी हे राजकीय षडयंत्र आहे असेे देखील साने यांनी सांगितले

सिसिटीव्हीत कैद झालेले आरोपी प्रथम साने यांच्या राहत्या घराकडे रेकी करून गेल्याचे समजते तीथे सानें दिसले नसल्याने त्यांनी कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवल्याचे समजते. यावरून हे कळते की, या आरोपींच्या निशाण्यावर दत्ता साने होते.

दरम्यान, देवेंद्र बीडलांन (राहणार – औधरोड खडकी पुणे )सॅमसंग (राहणार खडकी पुणे) या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यातील इतर आरोपी फरार आहेत.

Share this: