पिंपरी-चिंचवड :विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाची तोडफोड करणारे दोघे आरोपी अटकेत
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते दत्ता काका साने यांच्या चिखली येथील कार्यालयाची दि. ७ रोजी काही अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड करून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आता यातील दोन आरोपींना भोसरी पोलीसांनी अटक केली आहे. कार्यालयातील कर्मचा-यांसोबत झालेल्या भांडणातून हा प्रकार झाला असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
देवेंद्र बीडलांन (राहणार – औधरोड खडकी पुणे )सॅमसंग (राहणार खडकी पुणे) या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यातील इतर आरोपी फरार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली या ठिकाणी असलेल्या जनसंपर्क कार्यालयात अज्ञात तरुणांनी शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास कार्यालयात येऊन हल्लेखोरांनी मोठ्या हत्यारासह साहित्याची तोडफोड करत मोठे नुकसान केले होते.तसेच कार्यालयातील कर्मचा-यांना ही मारहाण केली होती.
त्यामुळे या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चिखलीकरांनी निषेध व्यक्त करत दुकाने बंद ठेवली होती .सिसिटीव्हीत हल्लेखोर दिसल्याने त्याच्या आधारे पोलिसांनी चोवीस तासात तपासाला गती दिली शिवाय बारा तासामध्ये जर हल्लेखोर सापडले नाहीत तर आम्ही कायदा हातामधे घेऊ असा ईशाराही दत्ता काका साने यांनी दिला होता .