क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

दत्ताकाका साने जनसंपर्क कार्यालयांच्या तोडफोडीच्या निषेधार्थ चिखलीकरांचा कडकडीत बंद

पिंपरी -पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते दत्ता काका साने यांच्या चिखली येथील कार्यालयाची दि. ७ रोजी काहीअज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड करून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.हा प्रकार भर दिवसा घडला असुनही पोलीसांना हल्लेखोरांना पकडण्यात अजुनही यश आलेले नाही. त्यामुळे हल्यामागचे कारणही स्पष्ट झालेले नाही . 

 

त्यामुळे या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चिखलीकरांनी आज निषेध व्यक्त करत दुकाने बंद स्वेच्छेने सहभागी करत चिखलीत कडकडीत बंद ठेवली आहेत .शिवाय बारा तासामध्ये जर हल्लेखोर सापडले नाहीत तर आम्ही कायदा हातामधे घेऊ असा ईशाराही दत्ता काका साने यांनी दिला.

Share this: