बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये दर शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद राहणार नाही ;आयुक्त राजेश पाटील

पिंपरी (वास्तव संघर्ष) : कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पाश्र्वभूमीवर अजून पंधरा दिवस लाॅकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यातच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दर शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता शनिवार , रविवारी कडक असलेला ‘ विकेंड लॉकडाऊन ‘ रद्द करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने 11 वाजेपर्यंत सुरू राहणार असून शनिवारी आणि रविवारी पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने सुरु ठेवण्यास महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश दिले आहेत.

राज्यात फक्त पुणे जिल्ह्यात शनिवार , रविवारी विकेंड लॉकडाऊन लागू होता.शनिवारी , रविवारी फक्त दूध विक्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती.आता जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट होत आहे . आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्ह्यातील कोरोनाची आढावा बैठक झाली . यामध्ये विकेंड लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला . यानंतर आयुक्त पाटील यांनी शहरातील विकेंड लॉकडाऊन रद्द केल्याचे सांगितले आहे . महापालिका हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु राहणार आहेत . किराणा , भाजी , दूध , बेकरी , चिकन , मटण अशा आस्थापनांचा यात समावेश असेल .

आता पिंपरी चिंचवड शहरात विकेंड लॉकडाऊन नाही . इतर दिवशी जे निर्बंध असतात तेच शनिवार , रविवारी लागू असणार आहेत . पूर्वी विकेंडला सर्व बंद होते . केवळ दूध विक्रीला सकाळी नऊ वाजेपर्यंत परवानगी होती . आता भाजी , दूध , बेकरी , चिकन , मटणची दुकाने शनिवारी आणि रविवारी दिवसभर सुरू राहतील . बाकीचे लॉकडाऊनचे सर्व नियम लागू आहेत .

Share this: