क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

ईमेल हॅक करून फोर्ब्स मार्शल कंपनीला लाखोंचा गंडा ; आरोपीविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) :- पिंपरी चिंचवड शहरातील फोर्ब्स मार्शल कंपनीला अज्ञात आरोपीने लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जर्मनी येथील एका कंपनीच्या मेलद्वारे फोर्ब्स मार्शलने पाठवण्यात आलेले 50 लाख 27 हजार 437 रुपये अज्ञात आरोपीने ईमेल हॅक करून ते पैसे एका बँक खात्यात ट्रान्स्फर केले .

पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे .

हेमंत गणेश झेंडे ( वय 57 , रा . तळेगाव दाभाडे ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांच्या फोर्ब्स मार्शल या कंपनीकडून जर्मनी येथील डायकॉम कंपनीला परकीय चलन 56 हजार 450 युरो ( भारतीय चलनात 50 लाख 27 हजार 437 ) ईमेल द्वारे संपर्क करून पाठवण्यात आले . दरम्यान अज्ञात आरोपीने जर्मनी येथील डायकॉम कंपनीचा ईमेल हॅक केला आणि फोर्ब्स मार्शल या कंपनीकडून पाठवण्यात आलेले 50 लाख 27 हजार 437 रुपये अल्स्टर बँक आयर्लंड या बँकेच्या एका खात्यावर परस्पर ट्रान्स्फर केले . त्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत .

Share this: