दत्ताकाका अनंतात विलीन ;त्यांच्या पार्थिवावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अत्यंसंस्कार
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ताकाका साने यांचे आज (शनिवारी) सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अत्यंसंस्कार करण्यात आले.
निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. महापौर उषा ढोरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर यावेळी उपस्थित होते.
आठ दिवसांपासून त्यांचा कोरोनाशी सुरु असलेला लढा आज संपला. सकाळी साने यांनी अखेरचा श्वास घेतला.गोरगरिबांच्या मदतीला धावणारा नेता गेल्याने शहरवासियांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.