नोकरी लावण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी तरूणांकडून दिड लाख उकळले
पुणे : (वास्तव संघर्ष) – नोकरी लावण्याच्या बहाण्याने तीन तरुणांकडून सायबर चोरट्यांनी दीड लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे . ऑक्टोंबर २०१९ मध्ये हा प्रकार घडला आहे . याप्रकरणी श्रीकांत उकीरडे ( वय २६ , रा . कात्रज ) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार , श्रीकांत हा उच्चशिक्षीत आहे . त्याला नोकरीची आवश्यकता होती . त्याच्यासोबतच इतर दोन मित्रांनाही नोकरीची गरज होती . यादरम्यान , आरोपींनी फिर्यादींशी संपर्क साधला . तसेच , अस्तित्वात नसणाऱ्या ऑप्रेटिक टेक्नॉलॉजी कंपनीत डेटा हुडूप व जावा डेव्हलपर्स या पदावर नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तिघांचा विश्वास संपादन केला .
त्यांना काही पैसे द्यावे लागतील असे सांगत तिघांकडून एकूण दीड लाख रुपये उकळले . त्यांना नोकरी लावल्याचे बनावट कागदपत्रे पाठविली . त्यांनी या कंपनीबाबत चौकशी केल्यानंतर अशी कोणतीच कंपनी नसल्याचे लक्षात आले . त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले . त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली . अधिक तपास वारजे पोलीस करत आहेत .