खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला निगडी पोलिसांनी केली अटक
पिंपरी (वास्तव संघर्ष) :-पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील खुनाच्या प्रयत्नाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल असलेला निगडी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलीसांनी अटक केली आहे.
जितेंद्र ऊर्फ जित्या आनंदा जाधव ( वय २० , रा . ओटास्कीम , निगडी ) असे आरोपीचे नाव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पोलीस नाईक निशांत काळे व आशिष बोटके यांना माहिती मिळाली की , निगडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी जितेंद्र आळंदी येथील गाथा मंदिराच्या पुलावर थांबला आहे . त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून जितेंद्र याला ताब्यात घेतले . त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली .
त्यावरून त्याला अटक करण्यात आली आहे . त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल असून तो निगडी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे . ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , उपायुक्त सुधीर हिरेमठ , सहाय्यक आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत , उपनिरीक्षक विठ्ठल बढे , पोलीस कर्मचारी निशांत काळे , आशिष बोटके , विक्रांत गायकवाड , प्रवीण कांबळे , सुधीर डोळस यांच्या पथकाने केली .