क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

स्पा मसाज च्या नावाखाली भोसरीत सेक्स रॅकेट चा पर्दाफाश

File Photo

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :-  भोसरी एमआयडीसी येथील स्पाईन सिटी मॉल येथे गुन्ह्यातील आरोपी सिटी स्पा मसाज या नावाने स्पा सेंटर चालवत होते. या सेंटरच्या नावाखाली आरोपींनी तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यातून मिळणारी काही रक्कम स्वतःसाठी ठेऊन त्यावर आपली उपजीविका भागवली.

याबाबत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा रचून चार जणांना अटक केली. तसेच सहा स्थानिक तरुणींची सुटका केली आहे.

ही कारवाई बुधवारी (दि. २२) सायंकाळी सहाच्या सुमारास स्पाईन सिटी मॉल भोसरी एमआयडीसी येथे केली. राजेश उर्फ तानाजी व्यंकटराव कानुरे (वय २९, रा. रुपीनगर, तळवडे), शिवा नाना कोळपे (वय २०, रा. स्पाईन रोड, भोसरी), रितेश सुभाष घटकार (वय २०, रा. स्पाईन रोड, भोसरी), विक्रम व्यंकटराव पलांडे (रा. रुपीनगर, तळवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत

Share this: