बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

काय म्हणता..! डाॅ. बाबासाहेबांंच्या त्या परिषदेचा वर्धापन दिन पिंपरीत झाला उत्साहात साजरा

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील लोकसंख्या आजमितीस तीस लाख झाली आहे. या पिंपरी चिंचवड शहराला आज उद्योगनगरी म्हणून संबोधले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे 1972 साली पडलेला मराठवाड्यातील दुष्काळ होय.मराठवाड्यातील बहुसंख्य परिवार हे 1972 मध्ये  रोजगाराच्या शोधात पिंपरी चिंचवड गावात आले. आज याच पिंपरी चिंचवड गावाला शहर बनवण्यासाठी ‘मराठवाड्यातील लोकांचा खारीचा वाटा आहे.


असंच एक मराठवाड्यातील ऐतिहासिक गावकसबे-तडवळे होय.लातूर जिल्हा 1982 मध्ये स्वतंत्रपणे स्थापन झाला. त्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील जी गावे उस्मानाबाद जिल्ह्याला जोडण्यात आली, त्यांपैकी येडशी आणि कसबे-तडवळे ही दोन गावे मोठी होती. कसबे-तडवळे हे येडशी ते ढोकी या रस्त्यावरील गाव.

त्या गावाची वस्ती 1940-50 च्या काळात शंभर घरांची असेल.अशा त्या लहान गावात1941 साली महार, मांग आणि वतनदार परिषद झाली होती. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित राहिले होते. परिषदेच्या निमित्ताने, सोलापूर जिल्हा आणि मराठवाडा विभागामधील दलित समाजाचे ते पहिले अधिवेशनच घडून आले होते.

महार, मांग आणि वतनदार परिषदही दिनांक22 आणि 23 फेब्रुवारी1941 रोजी झाली होती. अशा ऐतिहासिक  गावातील आपला इतिहास पिंपरी चिंचवड शहरात जिवंत करण्यासाठी या गावातील तरूणांनी महार, मांग आणि वतनदार परिषदचा 83 वा वर्धापनदिन 22 फेब्रुवारी 2024 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या आवारात मोठ्या जल्लोषात साजरा केला.


यावेळी गायक-मुन्ना भालेराव,मनोज गरबडे,प्रीतमकुमार भालेराव,अजीत सोनवणे,विश्वजित भालेराव,सागर भालेराव,अक्षय गायकवाड,अॅड दिपक साबळे, सुरज साळवे पंकज भालेराव,प्रणव भालेराव,सारीपुत्र भालेराव,जयशिल वाघमारे अतीष सोनवणे,पिंटु भालेराव, आकाश इजगजउपस्थित होते. दरम्यान, याच गावाचे सुपुत्र गायक मुन्ना भालेराव यांनी “लातूर पुण्याच्या मार्गावर गावाचं नाव आहे तडवळे बरं, तीथं महामानव आलता थोरं.. दोन दिवस मुक्कामी राहीलाय माझा भिमराव आंबेडकर..! हे त्यांचे आगामी गीत गात वर्धापनदिनानिमित्त सादर केले.

Share this: