गल्लीतल्या कुत्र्यांसारखं शिवसैनिकानी माझे पुतळे जाळले. हिंमत असेल तर समोर या -निलेश राणे
वास्तव संघर्ष न्यूज – गायक सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचे नाते काय, हे मला सांगायला लावू नका, नाहीतर हे सगळं मी जाहीर संभेत सांगीन, अशा शब्दात निलेश राणे यांनी शिवसेनेला धमकीही दिली होती तसेच राणे यांनी म्हटले होते. आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचल्याचे आणि त्यांचा मृत्यू रुग्णालयात झाल्याचे भासवण्यात आले. हे दोन शिवसैनिकांना सहन झाले नाही, त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी कोणाला आदेश दिले. ही केस कशी दाबली गेली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. या आरोपानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
असा आरोप करत खळबळ उडवणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे आणि ठाकरे परिवारातील वाद शमण्याची चिन्हे दिसत नसून आता नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसैनिकांना इशारा वजा धमकीच दिली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर गंभीर आरोप केल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी नीलेश राणे यांचे पुतळे जाळले होते. या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी ट्विटरवर शिवसैनिकांना दम भरला आहे
नीलेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी काही ठिकाणी नीलेश राणे यांचा निषेध करत त्यांचे पुतळे जाळल्याची बातमी होती. या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी शिवसैनिकांवर बोचरी टीका केली. ट्विटमध्ये नीलेश राणे म्हणतात, मान सन्मान द्याल तर मान सन्मान मिळेल. गल्लीतल्या कुत्र्यांसारखं काही शिवसैनिकानी माझे दोन- तीन ठिकाणी पुतळे जाळले. हिंमत असेल तर समोर या आणि परत जाऊन दाखवा. परत सांगतो अवकातीत रहा ठाकरेंची अब्रू वाचवा
मान सन्मान द्याल तर मान सन्मान मिळेल. गल्लीतल्या कुत्र्यांसारखं काही शिवसैनिकानी माझे दोन तीन ठिकाणी पुतळे जाळले. हिंमत असेल तर समोर या आणि परत जाऊन दाखवा. परत सांगतो अवकातीत रहा ठाकरेंची अब्रू वाचवा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 15, 2019