बातम्यामहाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरेंनी गायक सोनू निगम यांच्या हत्येचा कट रचला होता.

गायक सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचे नाते काय, हे मला सांगायला लावू नका, नाहीतर हे सगळं मी जाहीर संभेत सांगीन, अशा शब्दात निलेश राणे यांनी शिवसेनेला धमकीही दिली.

कणकवली (प्रतिनिधी) :सोनू निगम याला मारण्याच्या कटाबाबत खात्री करायची असल्यास तुम्ही सोनू निगम यांनाही विचारू शकता, तेव्हा ते घाबरलेले असतील, मात्र आज बाळासाहेब हयात नाहीत, त्यामुळे सोनू निगम खरं सांगू शकतील असा आरोप करत खळबळ उडवणारे माजी मुख्यमंत्री  नारायण राणे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या हत्येचा कट रचला होता, असा सनसनाटी आरोप राणे यांनी केला. इतकंच नाही, तर सोनू निगम यांना मारण्याचे अनेकदा प्रयत्न झाले असाही राणे यांचा आरोप आहे. राणे कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गौप्यस्पोट करत खळबळजनक आरोप केला आहे.

गायक सोनू निगम याला मारण्याच्या कटाबाबत खात्री करायची असल्यास तुम्ही सोनू निगम यांनाही विचारू शकता, तेव्हा ते घाबरलेले असतील, मात्र आज बाळासाहेब नाहीत, त्यामुळे सोनू निगम खरं सांगू शकतील, अशी पुस्तीही राणे यांनी जोडली. गायक सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचे नाते काय, हे मला सांगायला लावू नका, नाहीतर हे सगळं मी जाहीर संभेत सांगीन, अशा शब्दात राणे यांनी शिवसेनेला धमकीही दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्जतमधील फार्म हाऊसवर कुणाकुणाचे मृत्यू झाले हे आपल्याला माहीत असून तेही मी सांगू शकतो, आमच्या नादी लागू नका, आम्हाला राणे म्हणतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे

Share this: