बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

आयुक्तांच्या डोक्यात कांदे बटाटे भरलेत ;त्यांच्या तोडाला काळे फासणार – दत्ता साने

पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांचा ञास वयोवृद्ध महीला घरेलू महीलेला आणि सामान्य नागरिकांना होत आहे.या कचरा संकलनाच्या गाडीची उंची सामान्य नागरिकांच्या उंची पेक्षा जास्त आहे. त्यामुळे वृध्द  महिला आणि नागरिकांनी टाकलेला कचरा उडून त्यांच्या नाकातोंडात जात आहे.राष्ट्रवादी कॉग्रेस च्या काळात स्मार्ट सिटी होती आता कचरा सिटी बनविली आहे. भाजपने आजची सभा तहकूब करून आपला पळपुटेपणा पणा केला आहे. असा आरोप महापालिकेतील विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांनी पञकार परिषदेत केला.

साने पुढे बोलताना म्हणाले, यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील सावळा गोंधळ यावर विरोधक एकत्र आल्याचे पाहूनच भीतीने भाजपने आजची सभा तहकूब केली आहे. वायसीएम मधील वाबळे हे मानधनावरील डॉक्टर असून त्यांना कायमस्वरुपी पदावर रूजू कसे केले? पिजी आणि वायसीएम माहीत नसलेल्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या डोक्यात कांदे बटाटे भरले आहेत.पिंपरीचिंचवड मधील  सामान्य रूग्णांना  मानधनावरील डाॅक्टरांकडे जावे लागत असेल तर आयुक्तांना काळे फासले पाहिजे.

शिक्षण समिती नावावर एकमत न झाल्याने तहकूब

आज शनिवार दुपारी 2 वाजता पिंपरी पालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली.पिंपरी महापालिकेचे माजी उपमहापौर शेषेप्पा नाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकूब करण्यात आली.

Share this: