क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

निगडीत गॅस वाहतुक करणारा टँकर झाला पलटी

निगडी (वास्तव संघर्ष) : मुंबई कडून पुण्याच्या दिशेने जाणारा गॅस वाहतुक करणारा टँकर कै मधुकरराव पवळे पुलाच्या सुरवातीला अपघातग्रस्त होऊन पलटी झाला आहे. ही घटना आज रविवारी (दि.25) रोजी पहाटे 3.30वाजता घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे 3.30वाजता गॅस वाहतुक करणारा BPCL कंपनीचा प्राथमिक माहितीनुसार मुंबई कडून पुण्याच्या दिशेने जाणारा टँकर निगडितील कै. मधुकरराव पवळे पुलाच्या सुरवातीला अपघातग्रस्त होऊन पलटी झाला आहे.

सदर घटना समजताच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अग्निशमन विभाग 4 टीम तसेच मुख्य अग्निशमन अधिकारी विजय थोरात,अग्निशमन अधिकारी चिपाडे तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रमुख श्री ओमप्रकाश बहिवाल, पोलीस उपायुक्त, विवेक पाटील ,सहाय्य कपोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, उपायुक्त रविकिरण घोडके वरीष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे व इतर 50 पोलीस इत्यादी पोहोचले असून पुढील कार्यवाही सुरू आहे .सध्या गॅस ट्रान्सफर करणेसाठी वाहने आलेली असून कार्यवाही सुरू आहे. घटनास्थळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ हे ही उपस्थित आहेत.

Share this: