विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याची उंची वाढणार ;मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता
वास्तव संघर्ष आॅनलाईन – दादर येथील इंदू मिलच्या जागेवरील भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची वाढवण्याच्या सुधारित प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे
आज पत्रकार परिषद घेऊन उपमख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित घोषणा केली . आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली . अजित पवार म्हणाले की डॉ . बाबासाहेब स्मारकातील पुतळ्याची उंची 100 फुटाने वाढवण्यात येणार आहे . स्मारक विभागाच्या सर्व परवानग्या 8 दिवसात देण्यात येतील असेही अजित पवार म्हणाले . पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की 2 वर्षात स्मारकातील पुतळ्याचे बांधकाम पूर्ण करणार आहोत . तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यात येईल . स्मारकांसाठी सरकार निधी कमी पडू देणार नाही . देखणं , दिमाखदार स्मारक उभारण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला .