शारीरिक संबधाचा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत बिल्डरांचा महिलेवर बलात्कार
पिंपरी (वास्तव संघर्ष) शारीरिक संबधाचे फोटो आणि व्हीडीओ सोशलमिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिल्या प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी याच्या विरोधात एका पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .
याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे . त्यानुसार भादंवी कलम ३७६ , ३१३ , ३२३ , ५०४ , ५०६ , ४२० आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी सुधीर आणि पिडीत महिलेची एका नृत्याच्या प्रोग्राममध्ये ओळख झाली होती . त्यावेळी आरोपी सुधीर याने महिलेचा मोबाईल क्रमांक घेतला . त्यानंतर त्यांच्याशी फोनवर बोलून ओळख वाढवली . तसेच लग्नाची मागणी घातली . परंतु फिर्यादी यांनी त्याला नकार दिला . त्यानंतर आरोपीने पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला . तसेच फसवणूक करून त्यांना एक फ्लॅट भाड्याने घेऊन दिला . तसेच त्याठिकाणी शितपेयामधून गुंगीचे औषध दिले आणि बलात्कार केला . ते मोबाईल मध्ये रेकॉर्डकरून घेतले .
त्यानंतर परत त्या फ्लॅटवर जाऊन शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले . पिडीत महिलेने विरोध केला असता फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनैसर्गिक कृत्य केले . तर पीडित महिला गरोदर राहिल्यानंतर त्यांच्या समंतीशिवाय गर्भपात केला . अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत .