गि-हाईकांना शिव्या दिल्या म्हणून डोक्यात दगड घालून केला खून
चिखली (वास्तव संघर्ष) :दारु पिण्यासाठी येणा-या
गि-हाईकांना शिव्या दिल्या म्हणून दारु विक्री करणाऱ्या मालकाने आपला कामगारांचा डोक्यात दगड घालून खून केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.19)रोजी भिमशक्तीनगर झोपडपट्टी मोरेवस्ती चिखली येथे सकाळी नऊ ते साडेअकराच्या सुमारास घडली आहे.
मनोहर गलाप्पा डोंगरे( वय-55)असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सुनिल मनोहर डोंगरे (वय-24, रा. अजंठानगर , चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आशिष गवळी( रा . भिमशक्तीनगर झोपडपट्टी मोरेवस्ती चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष याचा दारु विक्रीचा धंदा असुन मयत मनोहर डोंगरे हे तेथे दारु विकण्याचे काम करीत होते. दारु धंदयावर दारु पिण्यासाठी येणा-या गि-हाईकांना मयत मनोहर याने शिव्या दिल्या होत्या याचा राग मनात धरुन आरोपी आशिष याने मनोहर यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन त्याचे डोक्यात पाठीमागील बाजुला दगड मारुन खून केला. आरोपी आशिष गवळी फरार असून चिखली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सय्यद अधिक तपास करीत आहेत.