बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील ‘वायसीएम’ रुग्णालयाला आता खाजगी बाऊंसरचा पहारा

पिंपरी ( वास्तव संघर्ष ) -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे कोरोना साठी समर्पित करण्यात आले आहे. याठिकाणी करोनाबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार केले जातात . तसेच याठिकाणी काम करणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना 25 आणि 27 जुलै या दोन दिवसांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून एका नगरसेवकाकडून रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्कीचे प्रकार घडला होता.

याबाबत वायसीएममधील डॉक्टरांना झालेल्या धक्काबुक्की घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांचे सुरक्षाकवच वाढविले जाणार असून याठिकाणी खासगी बाउन्सरची नियुक्ती केली जाणार आहे . यामध्ये चार महिला व आठ पुरुष बाउन्सरचा समावेश आहे . वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल टिकवून ठेवण्यासाठी ही खासगी सुरक्षा तैनात केली जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

याकरिता येणाऱ्या सहा लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव बुधवारी ( दि .5 ) होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे . त्यानुसार ‘ प्रोटेक्शन पॉवर बाऊंसर ‘ या संस्थेने अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना कोटेशन सादर केले . अतिरिक्त आयुक्तांनी या संस्थेकडून 1 महिला व 3 पुरुष बाऊंसर ‘ असे तीन पाळीत एकूण 12 ‘ बाऊंसर ‘ पुढील दोन महिन्यासाठी घेण्याचे आदेश सुरक्षा अधिका – यांना दिले होते . ही बाब तातडीची आहे . त्यामुळे निविदा प्रणाली राबविली जाणार नाही . आयुक्तांची प्रशासकीय मान्यता घेऊन स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवला आहे . संस्थेच्या कोटेशननुसार एका बाऊंसर’ला प्रतिमहा 25 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे . त्यानुसार 4 महिला व 8 पुरुष ‘ बाऊंसर ‘ यांचा दोन महिन्यासाठी 6 लाख रुपये खर्च येणार आहे .

Share this: