क्रोमा माॅलजवळील बौद्ध विहारच्या नावाखाली उभारलेले अनधिकृत पत्राशेड त्वरित काढा ;अन्यथा अधिका-यांच्या तोंडाला काळे फासू:डॉ. राजेश नागोसे
पिंपरी(वास्तव संघर्ष) : – पिंपरी मोरवाडी येथील कमला क्रॉस या इमारतीच्या ओपन स्पेस मध्ये अशोक केबल या दुकाना समोर नवीन अनधिकृत पत्राशेड उभारण्यात आले आहे ते त्वरीत काढून टाकण्यात यावे.तसेच त्याच्या शेजारीच असलेले बौद्ध विहारच्या नावाखाली उभारलेले अनधिकृत शेड देखील काढण्यात यावे.येथे बौद्ध विहारच्या नावाखाली विविध प्रकारचे व्यवसाय केले जातात. धार्मिकतेच्या नावाखाली काही अधर्मी लोक आपले काळे धंदे लपण्यासाठी आपला येथे व्यवसाय राजरोसपणे करताना दिसतात. या अनधिकृत शेडच्या विरोधात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना सारथी या वेबसाईटवर तक्रारी केल्या .
तसेच लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र अतिक्रमण विभागाने त्याला केराची टोपली दाखवली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ . राजेश नागोसे आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन दिले आहे.
या निवेदनात राजेश नागोसे यांनी म्हटले आहे की, कमला क्रॉस रोड च्या मागील गेट व पुढील बाजू जवळ अशोका केबल या दुकानाजवळ लॉकडाऊन काळात 2040 चे मोठे अनधिकृत पत्रा शेड्स दुकाने उभारले आहेत , या बाबत अनेक वेळा सारथी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रारी करण्यात आल्या पण कारवाई झाली नसल्याने या दुकानांवर मनपा बीट निरीक्षक व अधिकाऱ्यांचा वावर का असतो ह्याचे अंदाज घेता येतो , तरी सदरची दुकाने काढून घ्यावीत.तसेच या शेजारीच असलेले नेपाळी मार्केट आणि त्या शेजारी असलेले बौद्ध विहारच्या नावाखाली उभारलेले अनधिकृतशेड यांना कार्यकारी अभियंता ग व ह प्रभाग यांनी ऑगस्ट 2019 ला नोटीशी दिल्या असून त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.या करिता आम्ही 29/09/2020 रोजी आंदोलन केले आहे ते देखील काढून घ्यावी . अन्यथा अतिक्रमण अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा नागोसे यांनी दिला आहे .
या भागातील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभागाचे बीट निरिक्षक कनिष्ठ अभियंता , उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांनी या शेडच्या मालकां बरोबर आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा संशय आहे . त्यामुळे या अनधिकृत शेडला अभय दिला जात आहे . त्यामुळे हे अनधिकृत शेड ताबडतोब काढून टाकण्यात यावे व संबंधित सर्व अभियंत्यांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्या विरोधात न्यायालयात जावे लागेल असे सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी पञात ईशारा दिला आहे. .