बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त आणि महापौर प्राइवेट बिल्डर्सचे ब्रोकर – नाना काटे

चिखलीतील गृहप्रकल्पात 1 हजार 169 सदनिका उपलब्ध होणार

पिंपरी(वास्तव संघर्ष) – पिंपरी-चिंचवड शहरात स्वतःचे घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने ऐश्वर्यम ग्रुप यांच्यासोबत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमुळे (पीपीपी) सर्वसामान्य नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जाधवाडी, चिखलीतील देहू-आळंदी रस्ता येथील गृहप्रकल्पात अल्प दरात स्वतःचे घर खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे मोठी आर्थिक बचतही होणार आहे. महापालिका व खासगी बांधकाम व्यावसायिकांमध्ये साकारत असलेला हा शहरातील पहिलाच गृहप्रकल्प आहे, अशी माहिती आज (सोमवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर राहुल जाधव यांनी दिली. या योजनेचा लाभ शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे. 

महापालिकेच्या आयुक्त दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला महापौर राहुल जाधव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, चिखलीतील ऐश्वर्यम हमाराचे संचालक सतीश अग्रवाल, संचालक दीपक माने, महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील व अधिकारी उपस्थित होते.  

माञ मनपातील महत्त्वाचे पद असलेले विरोधीपक्षनेते नाना काटे यांच्यासह इतर पक्षातील गटनेत्यांना या पञकार परिषदेला बोलवण्यात आले नाही यावर तातडीची पञकार परिषद घेत नाना काटे यांनी आयुक्त आणि महापौरांवर गंभीर आरोप केले आहेत.

यावेळी काटे म्हणाले, महापौरांनी आपल्या चिखली प्रभागात ही योजना आणण्याचा घाट रचला तेथे कुणीही प्लॅट घेण्यास धजावत नाही म्हणून सरकारी योजना करत प्रायव्हेट बिल्डरशी हातमिळवणी केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला त्यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करत मनपाचे आयुक्त आणि महापौर प्राइवेट बिल्डर्सचे ब्रोकर
झाले आहेत.

दरम्यान आयुक्त आणि महापौर यांनी घेतलेल्या पञकार परिषदेला तुम्हाला बोलावले होते का? असा प्रश्न काटे यांना विचारला असता ते म्हणाले `माझा फोन चोवीस तास चालू असतो आणि आज मी पालिकेतच होतो कुठेही गेलो नव्हतो मीच आलो नाही असे म्हणणारे आयुक्त आणि महापौर पञकारांची दिशाभूल करतात असेही नाना काटे यावेळी स्पष्ट केले.

Share this: