कस्टम अधिका-यांनी पकडले असल्याचे सांगुन महीलेची लाखो रूपयांची फसवणूक
वाकड (वास्तव संघर्ष) : मॅट्रिमोनियल साईटवरून घटस्फोटीत महीलेशी बनावट नावाने संपर्क करुन अमेरीकेत डॉक्टर असल्याचे सांगुन विश्वास संपादन लग्नाचे अमीष दाखवुन तसेच औषधी बियांचा व्यवसाय करण्याचे सांगुन भारतात विमानतळावर कस्टम अधिका-यांनी पकडले असल्याचे सांगुन व वेगवेगळी कारणे सांगुन सदर महीलेची 12.29 लाख रुपये फसवणुक करणा-या परदेशी टोळीतील एका कांगो महिलेस वाकड पोलीसांनी दिल्लीमध्ये जावुन केली अटक केली आहे.
बियो ऑक्टावी (वय-28) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील एका घटस्फोटीत महीलेची मॅट्रोमोनियल डेटिंग अॅपवरुन माहीती घेवून आरोपी याने डॉ अर्जुन नावाने संपर्क केला व महीलेस तो युएसए मध्ये कॉस्मेटीक सर्जन डॉक्टर असल्याचे सांगुन फिर्यादीबरोबर चांगली ओळख वाढवुन फिर्यादीशी लग्न करण्याचे व भारतात येवुन स्थायिक होण्याचे अमीष दाखविले.सदर महीलेचा विश्वास संपादन करून त्याने त्याचे आईस हेड इंजुरी झाली असल्याने तिचेवर उपचारासाठी बेंगलोर येथील औषधी बियांचे औषधे पाठविण्यासाठी तसेच सदर औषधी बियांचे व्यवसायाकरीता बनावट बिया विकत घेण्यास भाग पाडले.
व त्या विकत घेण्यासाठी युएस मधील कंपनीचे परचेस मॅनेजरसह भारतात येत असल्याचे सांगितले व भारतात एअरपोर्टवर पासपोर्टवर ग्रिन कार्ड नसल्याने पकडले असल्याने व तेथुन सोडवुन घेण्यासाठी तसेच आजारी असल्याचे डॉलर कस्टम अधिकारी यांनी पकडले असल्याने ते सोडविण्यासाठी असे वेगवेगळ्या कारणासाठी मिळुन रुपये भरण्यास भाग पाडुन फसवणुक केली.दाखल गुन्हयाचे तपासामध्ये तांत्रिक माहीती घेवून सदरचे आरोपी महिलेस वाकड पोलीसांनी दिल्लीमध्ये जावुन केली अटक केली आहे.
सदरची कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे ,अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे ,पोलीस उप आयुक्त परि -२ , आनंद भोईटे,सहा.पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांचे मार्गदर्शनाखाली संतोष पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे -1, सहा.पोलीस निरीक्षक एस . एम . पाटील ,संभाजी जाधव,पोलीस अंमलदार दिपक भोसले,भास्कर भारती , शाम बाबा , विक्रम कुदळ , बंदु गिरी,कल्पेश पाटील,शुभांगी मेथे यांनी केली आहे.