दहिहंडीच्या कार्यक्रमातून मधूनच घरी गेल्यामुळे तरुणावर कटरने वार
चिखली (वासतव संघर्ष): दहिहंडीच्या कार्यक्रमातून मधूनच घरी गेल्यामुळे एका तरुणाला दोघांनी मिळून मारहाण केली तसेच कटरने त्या तरूणाच्या पोटावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.ही घटना शुक्रवारी (दि.19) रात्री दहाच्या सुमारास घडली.
संतोष प्रभाकर कांळबांडे (वय 19 रा.चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अशोक निर्मल (रा.जाधववाडी, चिखली) व अजय संतोष भागवत (वय 21 रा.जाधववाडी, चिखली) या आरोप विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तू दहिहंडीच्या कार्यक्रमातून मधूनच निघून का गेला असे म्हणत आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.यावेळी आरोपींनी खिशातील कटर काढून फिर्यादीच्या डाव्या हातावर मारले.यावेळी फिर्यादी यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता अजयने फिर्यादीला पकडून ठेवले व अशोकने कटर फिर्यादीच्या पोटावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले.अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.