गिर्यारोहक अरूण सावंत यांचा दरीत पडून मृत्यू;गिर्यारोहणप्रेमींवर शोककळा
पुणे – महाराष्ट्राचे नावाजलेले गिर्यारोहक अरूण सावंत यांचा दरीत पडून मृत्यू झाला आहे . हि घटना शनिवारी सकाळी हरिश्चंद्र गड परिसरात घडली . त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. माकडनाळ भागात सावंत यांच्यासोबत तिघेजण होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.या वृत्ताने गिर्यारोहणप्रेमींवर शोककळा पसरली आहे .
सविस्तर वृत्त असे की, हरिश्चंद्र गडाहून माकडनाळ या रॉकवर चढाई करण्यासाठी तीस जणांचे युनिटसह शनिवारी सकाळपासून क्लाईबिंग करत होते . अरूण सावंत लीड करत होते . कोकणकड्याहून आडवा रोप बोल्ड करायच्या प्रयत्नात असताना फॉल झाला अन् सुमारे ५५० फूट खोल दरीत खडकांवर सावंत पडले , त्यामुळे त्यांचा जागेवरच दुर्दैवाने मृत्यू झाला . मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळाला . महाराष्ट्रातला सर्वात जुना अनुभवी ट्रेकर म्हणून परिचित होते .
ड्युक्स नोज लोणावळ्याची मोहीम यशस्वी करणारा पहिला गिर्यारोहक , सह्याद्रीतल्या सर्वाधिक लोकप्रिय ठरत असलेल्या ट्रेकिंगच्या जागा सांधण व्हॅली , कोकणकडा रॅपलिंग , थिटबी वॉटरफॉल रॅपलिंग सारख्या जागा शोधणारे ते एक होते . गेली ४० वर्ष सह्याद्रीमध्ये प्रचंड भटकंती केलेला गिर्यारोहक म्हणून त्यांची ख्याती होती .