रुग्णांसोबत गैरवर्तन करणा-या ‘वायसीएम’ मधील डॉक्टरांवर कार्यवाही करण्याची मागणी
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील डॉक्टरांकडून रुग्णांशी गैरवर्तन केले जात आहे. याची गंभीर दखल घ्यावी . अशा गैरवर्तनाला पायबंद घालण्यासाठी उपाययोजना करुन , त्याच्यावर कारवाई करावी. अन्यथा याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा भिमशाही युवा संघटनेच्या वतीने दिला आहे . वायसीएमच्या वैद्यकीय अधीक्षकांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे .
वैद्यकीय अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , पिंपरी – चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना वायसीएमचा मोठा आधार आहे. महापालिकेच्या या रुग्णालयात अल्प दरात वैद्यकीय उपचार मिळत असल्याने या रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण येतात . मात्र , काही दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेला बाळंतपणासाठी दाखल होण्याची तारीख देऊनही , त्यादिवशी या गर्भवती महिलेला बाळंतपणासाठी रूग्णालयाने दाखल करुन घेतले नाही . एवढ्यावरच न थांबता त्यांनी अपमानित करुन घरी परत पाठवून दिले. या घटनेला जबाबदार डाॅक्टरांवर कडक कारवाई करावी.तसेच वायसीएम रुग्णालयातील गर्भवती महिलेसाठी राखीव वार्डात खाटांची संख्या वाढवण्याची देखील मागणी करण्यात आली.
भिमशाही युवा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे, राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी शहराध्यक्ष ज्ञानेश्वर बोराटे, नितीन कसबे, अशोक मामा बनसोडे, दत्ता ढोबळे, लक्ष्मण पांचाळ, शांताराम खुडे, अमोल झेंडे, रामभाऊ ठोके, विजय ओव्हाळ, आकाश कांबळे, सीमाताई पांचाळ, लक्ष्मण पांचाळ, प्रदीप टोपे,विजय ओव्हाळ लक्ष्मी जाधव, मायाताई बनसोडे सीमाताई पांचाळ रामभाऊ ठोके, बाळासाहेब जाधव यावेळी उपस्थित होते.