किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात रिक्षाचालकाला जबर मारहाण

पिंपरी (वास्तव संघर्ष) -पिंपरी चिंचवडच्या मोशी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात रिक्षाचालकाला जबर मारहाण करण्यात आली आहे . याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही घटना आदर्शनगर , मोशी येथे घडली . विठ्ठल गोविंद बोदले आणि आकाश बधे ( दोघेही रा . आदर्शनगर , मोशी ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे .

याप्रकरणी मारूती गंगाधर देवईबोने ( वय 33 , रा . श्रीराम कॉलनी , धर्मवीर चौक , मोशी ) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , 4 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास आदर्शनगर . गणपती मंदीराजवळ आरोपी भेटले . फिर्यादी यांनी त्यांना जेवण झाले का ? , अशी विचारणा केली . मात्र , आरोपींचा काही गैरसमज झाल्याने त्यांनी फिर्यादी देवाईबोने यांना शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली . यामुळे त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले . त्यानंतर आरोपी आकाश याने लोखंडी टॉमीने मारहाण करून जखमी केले . एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत

Share this: