क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

रिक्षा स्टँडवर रिक्षा लावण्याच्या कारणावरून रिक्षाचालकाला बेदम मारहाण

पिंपरी (वास्तव संघर्ष) रिक्षा स्टँडवर रिक्षा लावण्याच्या कारणावरून तिघांनी मिळून दोघांना शिवीगाळ करत रिक्षा चालकासह आणखी एकाला बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार पिंपळे गुरव येथे महालक्ष्मी रिक्षास्टँड येथे शनिवारी (दि.24) दुपारी साडे चारच्या सुमारास घडला.सतिश लक्ष्मण धोत्रे (वय30 रा. पिंपळे गुरव) यारिक्षा चालकाने सांगवी पोलिस ठाण्यात रविवारी (दि.25) फिर्याद दिली आहे.

त्यानुसार रोहित विजय जाधव (रा.पिंपळे गुरव), योगेश बनपट्टे व करण स्वामी (रा. पिंपळे गुरव)यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी हे रिक्षा चालक असून ते शनिवारी पिंपळे गुरव येथील पंचशिल क्लब शेजारील महालक्ष्मी रिक्षा स्टँडवर रिक्षा लावली.यावेळी आरोपीनी तेथे येत फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात करत हाताने व लाथा बुक्क्याने मारहाण केली.यावेळी शेजारून जाणारा आशिष शिंदे याला काहीही कारण नसताना आरोपीने त्यालाही मारहाण केली.यावरून सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढिल तपास करीत आहेत

Share this: