अन्याय झालेल्यापेक्षा अन्याय करणा-याची बाजू घेणा-या चाटू पञकारांमुळे पञकारिता होतेय बदनाम
दिपक साबळे….!
पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे हे मागासवर्गीय समाजाचे असल्याने त्यांना वित्तीय अधिकार मिळू नये म्हणून गेली चार वर्षे त्यांच्यावर अन्याय करण्यात येत आहे. मात्र आयुक्त (प्रशासनाचा) विषय भाजपचे नगरसेवक तथा स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी यांनी जातीयतेच्या भावनेतून गेली चार महिने हा विषय मुद्दाम तहकूब ठेवण्यात आला. सत्य जगासमोर आणने हे पञकारांचे काम असते मात्र अन्याय झालेल्या मागासवर्गीय असलेले डॉ. पवन साळवे यांची सत्य बाजू मांडण्यापेक्षा साळवे यांना न्याय देणा-या सामाजिक कार्यकर्ते राजकीय संघटना आणि पञकारांना बदनाम करण्याचा प्रकार काही जातीयवादी पञकारांकडून राजरोसपणे सुरू आहे. अशा राजकीय पक्षांची चाटूगिरीमुळेच खरी पञकारिता व पञकार बदनाम होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तिजोरीची चावी स्थायी समितीकडे असल्याने स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी यांच्या समोर लाळघोटेपणा करणारे पञकार धन्य आहेत. सर्वसामान्यांच्या कर स्वरुपात आलेल्या पैशाची उधळपट्टी जाहीरात रुपी मागणारे पञकार आज ख-या पञकारांना बदनाम करत आहेत हे विशेष..!
खरं म्हणजे अशा चाटू पञकारांचे उद्योग पालिकेतील शिपाई ते अधिकारी यांना माहीत आहे त्यामध्ये अशा पञकारांना राञी एक दोन वाजेपर्यंत दिलेली पार्टी असो की पालिकेत संध्याकाळी स्यायीच्या दालनात बिर्याणी पार्टी खाण्याचे किस्से असो.. माञ मागासवर्गीय डॉ. पवन साळवे यांच्यावर झालेला अन्याय यांना उघड्या डोळ्यांनी दिसत नाही हेच पञकारीतेचे मोठे दुर्दैव..!
असे काही पञकार आपले आयुष्य चाटुगिरी करण्यात घालवत आहेत त्यांना जनाची नाही तर मनाची लाज का वाटत नाही असाच प्रश्न नागरिक विचारत आहेत. महत्वाचे म्हणजे पालिका दालनात कुजबुज चालू असते की सेवानिवृत्त झाले तरी खायला प्यायला काही पञकार पालिकेत आपला तळ ठोकून असतात.
असो सत्य परेशान हो सकता है पर पराजित नही या म्हणीप्रमाणे त्या पञकारांना बुध्दी भेटो आणि सत्य लिहीण्याचे धाडस मिळो..