बातम्यामहाराष्ट्र

पत्रकारांकडून जनतेला अपेक्षा;राजकारणासारखी विश्वासार्हता घालवू नका : विजय सुर्यवंशी

पुणे (वास्तव संघर्ष) राजकारणाची जनसामान्यांमधील विश्वासार्हता गेली आहे. ती परत मिळविण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. अशावेळी न्यायव्यवस्था व पत्रकारांकडून जनतेला अपेक्षा आहे. या दोन्ही क्षेत्रांचा प‍्रवास विश्वासार्हता नष्ट होण्याच्या दिशेने आहे. तसे होऊ देऊ नका. अन्यथा लोकशाहीला वाली उरणार नाही’, असे कळकळीचे आवाहन “शिवधर्म ” चे संपादक विजय सुर्यवंशी यांनी येथे केले.

” शिवधर्म ” पुणे जिल्हा आवृत्ती चा शुभारंभ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे संपन्न झाला.यावेळी रजपूत समाजात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांना सन्मानित करण्यात आले.सा.शिवधर्म ही एक उज्ज्वल राष्ट्रीय परंपरा आहे.संपादक विजय सुर्यवंशी यांची लेखणीही त्यांच्या वाणीएवढीच तरल,संवेदनशील व अंत:करणाला भिडणारी आहे.शिवधर्म ने वृत्तपत्रसृष्टीला नवे वळण देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. प्रशिक्षित पत्रकार तयार करण्याची योजना महाराष्ट्रात पत्रकार संघांच्या माध्यमातून ” शिवधर्म ” ने सुरु केली. सतत नवनवीन प्रयोग हे शिवधर्म चे वैशिष्ट्य राहिले आहे,असे उदगार लिज्ज्त पापड समूहाचे संचालक श्री.सुरेश कोते यांनी काढले.

ज्येष्ठ पत्रकार मा.विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.ङाॅन के.के.यांनी प्रस्तावना केली. यावेळी प्रमुख पाहुणे ङाॅ.दत्ता कोहिनकर होते.तुम्हा सर्वांच्या प्रयत्नाने सा शिवधर्म हे पुण्यातीलच नव्हे तर राज्यातील अग्रगण्य सप्ताहिक होईल’ असे डॉ.कोहिनकर म्हणाले.आज राजकीय नेतृत्त्वाची सहनशीलता कमी होत आहे. त्‍यातूनच राजकीय नेते विरोधात लिहून आले की चिडतात. मात्र, सोबतच पत्रकारितेतील विश्वसनीयतादेखील महत्त्वाची ठरते.

पत्रकारितेत सत्याचा आधार नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. पत्रकारितेच्या धर्माचे पालन होण्याची गरज आहे’, असे मत जेष्ठ पत्रकार देवेंद्र जैन यांनी मांडले.तसेच सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणारे सरदार दाभाडे घराण्याचे वंशज सत्यशील राजे दाभाडे यांनी,’शिवधर्म हा छत्रपती शिवराय आणि महाराणा प्रताप या दोन पराक्रमी राजांच्या विचारांवर चालणार असून त्यातून सकारात्मक बदल घडेल ‘ असे आपल्या भाषणातून सांगितले.

प्रकाशन सोहळ्याचे आभार प्रदर्शन पुणे जिल्हाध्यक्ष श्री.सागर ननावरे यांनी केले.यावेळी महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघांचे श्री.प्रवीण परमार,जास्मिन दास,ङाॅ.सुरेंद्र शिंदे, भीमराव शिरसठ,त्यागराज चौव्हाण, नितीन जोशी,प्रतिमा चौव्हाण, राहूल बोर्डे सह पुणे आवृत्ती कार्यकारी संपादक श्री.गिरीश घोरपडे,उपसंपादक सुनील परदेशी, उपकार्यकारी संपादक शिवकुमार बायस,श्रीरामसिंह परदेशी, सहकार्यकारी संपादक विरेद्रसिंग ठाकुर, नंदकुमार बोळे,सहसंपादक संतोषसिह परदेशी,सुरेंद्रसिंग ठाकुर ,प्रसिद्धी प्रमुख सुरेश सुर्यवंशी, अशोकसिंह इंगळे, दिनेश जाधव,लक्ष्मण चव्हाण ,सदस्य दिपकसिंह गहरवार,दिनेषसिंह रजपूत, हेमतसिंह परदेशी,सौ.हेमलता परदेशी,सौ.पायल परदेशी, सौ.सुरेखा परदेशी आदी यावेळी उपस्थित होते.

Share this: