थेरगावात सापडला मांडुळ जातीचा साप ;सर्पमित्रांच्या प्रसंगावधानामुळे वाचली सापाची तस्करी
पिंपरी (वास्तव संघर्ष) – आंतराष्ट्रीय स्तरावर अतिसंरक्षीत वन्यजीव प्रजाती म्हणून घोषित ‘मांडुळ’या दोन तोंडांच्या सापांची तस्करी होण्यापासून प्राणीमिञांनी सुटका केली आहे. राजू कदम, गणेश जाधव आणि आफताब शेख असे या प्राणीमिञांचे नाव आहेत.
सविस्तर वृत्त असे की, पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव भुमकर चौकातील पानपट्टी खाली दोन तोंडीचे जीवंत मांडुळ साप सोमवार २६ आॅगस्ट सायंकाळी ४ च्या दरम्यान आले असता त्या मांडुळ सापाला (बिनविषारी) विकण्याचा प्लॅन काही उपद्रवी व्यक्ती करणार होते.हे सर्पमित्र राजू कदम, गणेश जाधव आणि आफताब शेख यांना समजताच त्यांनी लागलीच त्या ठिकाणी जात त्या मांडुळाची सुटका करत पुणे जिल्हा वनविभागाचे भाबुर्डा येथे सुपुर्द केले आहे.