बातम्या

चिंचवड पिंपरी आणि भोसरीत राष्ट्रवादीचाच आमदार ;नाना काटे यांचा एल्गार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांनी आपल्या पदाचा कार्यकाल पूर्ण करून आपल्या पदाचा राजीनामा नुकताच दिला होता. आज दि. १ ऑगस्ट रोजी विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनी पदभार स्वीकारला.

यावेळी पञकारांशी वार्तालाप कार्यक्रमात काटे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील विकास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात झाला माञ शहरातील विविध प्रश्नांवर सत्ताधारी भाजपकडे काहीही उत्तर नाही. त्यामुळे प्रलंबित प्रश्नांला मार्गी लावण्यासाठी मी विरोधीपक्षनेता म्हणून कायम काम करेन.

दरम्यान येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही आमदार असतील आणि मी असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार असेल असेही नाना काटे म्हणाले.

Share this: