गुप्त मतदान नाही थेट प्रक्षेपण करून मतदान करा ;उद्याच ठरणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
वास्तव संघर्ष आॅनलाईन :-महाराष्ट्रातील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने दाखल केलेल्या संयुक्त याचिकेवर आज सकाळी साडे दहा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.माननीय न्यायमूर्तीनी यावेळी महाराष्ट्रात घोडेबाजार होऊ नये म्हणून उद्या दिनांक 27 रोजी सायंकाळी 5 वाजण्यापूर्वी विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावाचे कामकाज पूर्ण करण्याचे आदेश मा. सुप्रीम कोर्टाने दिले आहेत त्यामुळे उद्याच होणार महाराष्ट्राचा शपथविधी
सदरचे कामकाज पारदर्शक होण्यासाठी मतदार उघडपणे तसेच थेट प्रक्षेपण आधारे करण्याचे निर्देश.सुप्रीम कोर्टाने दिले आहे.त्यामुळे गुप्त मतदान नव्हे आता मतदार मतदानाचे थेट प्रक्षेपण बघू शकतात
दरम्यान फडणवीस सरकारचा उद्या कसोटीचा दिवस असून उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत चिञ स्पष्ट होईल महाराष्ट्रात सरकार कुणाचे असेल.