क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

धक्कादायक : पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेलेल्या दलित कुंटूबाला लोखंडी रॉडने मारहाण

चिखली (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमधील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या दलित कुंटूबाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली आहे. ही घटना रविवारी (दि. 20)रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान साई कृपा सोसायटी, नॅशनल गॅरेजजवळ जवळ, सहयोगनगर तळवडे येथे घडली आहे.

विजय नागनाथ दाखले ( वय-32,जात-मातंग) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुरेश परिहार, प्रकाश सुरेश परिहार,महिला आरोपी (सर्व आरोपी रा. मसुरकर यांचेकडे भाडोञी सहयोगनगर तळवडे पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दाखले व आरोपी एकमेकांच्या शेजारी राहण्यास असुन नळावरील पाण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद आहेत . फिर्यादी दाखले यांची मुलगी ते राहत असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेली असताना आरोपी महिलाने तिला पाणी भरू दिले नाही, त्यामुळे फिर्यादी दाखले यांची पत्नी ही नळावर गेली असताना आरोपी महिलेने फिर्यादी दाखले यांच्या पत्नीला दोन्ही हाताने पकडुन शिवीगाळी केली, तसेच आरोपी प्रकाश याने फिर्यादी यांच्या पत्नीच्या गालावर चापट मारुन हाताने मारहाण केली.

त्यावेळी फिर्यादी दाखले हे त्याठिकाणी गेले असताना आरोपी सुरेश व प्रकाश यांनी सार्वजनीक ठिकाणी असलेल्या रोडवर फिर्यादी दाखले यांना घिसाडी, महार, मांगानो आमचेकडे पाणी भरायला येवु नका असे जातीवाचक बोलुन आरोपी प्रकाश याने लोखंडी रॉडने फिर्यादी दाखले यांच्या पाठीत पायाला व खांदयाला मारले तसेच आरोपी सुरेश यांने फिर्यादी दाखले यांच्या कानाजवळ जोरात नखे मारुन दुखापती केल्या त्यानंतर आरोपी महिलाने रस्त्यावर पडलेला दगड फिर्यादी दाखले यांना मारला. सदरील आरोपींवर पोलिसांनी ॲस्टोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Share this: