बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

मालमत्ताकर थकबाकी असलेली तब्बल 106 दुकाने पालिकेने केली सिलबंद

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांचे थकीत कर वसूलीची कारवाई सुरू आहे. थकबाकीदारांचे कर वसूली कामी माहे मार्च 2022 मध्ये करवसूली मोहिम तीव्र करणेत आली आहे.आतापर्यंत एकूण 483.52 कोटी मालमत्ता कर वसूली झाली आहे .

कर संकलन विभागाचे 16 करसंकलन विभागीय कार्यालयातील वसूली पथकामार्फत थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीसा देणेची कार्यवाही चालू असून ज्या थकबाकीदारांनी नोटीस देऊनही कर भरणेस टाळाटाळ केली अशा मालमत्ताधारकांचे मालमत्ता जप्ती कारवाई करण्यात आली त्यामध्ये आज सोमवार( दि.21) रोजी 106 दुकाने पालिकेने सिलबंद केली असून 60 नळजोडणी तोडण्यात आली आहे.

मालमत्ता कराची थकबाकी वसूलीकामी आयुक्त राजेश पाटील व अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन आढावा घेऊन थकबाकीदाराचे मालमत्ता जमी मोहीम तीव्र करणेत येत आहे. अवैध बांधकाम शास्ती वगळून मूळ कराचा भरणा करणेची नागरिकांना सुविधा देणेत आली आहे. त्यामुळे नागरिकांनी मालमत्ता थकीत मूळ कर भरणेचे आवाहन करणेत येत आहे. तरी त्वरीत मालमत्ता कर भरणा करून पाणीपुरवठा खंडीत होणे मालमत्ता सील होणे यासारखी कठोर कारवाई टाळावी असे आवाहन करणेत येत आहे.

Share this: