क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी केले तडीपार;फोटोसह नाव पोलिसांनी केले प्रसिद्ध

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- पिपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या परिमंडळ एकच्या हद्दीतील २४ सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. यामध्ये निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्वानंद उर्फ चिक्या नागेश खरात (वय 22, रा. थरमॅक्स चौक, चिंचवड), संग्राम उर्फ आवळ्या गुरूनाथ भोसले (वय 27), धनंजय उर्फ बबल्या सूर्यकांत रणदिवे (वय 20, रा. दळवीनगर, औटास्कीम), विकी उर्फ विकास शिवाजी लष्करे (वय 23, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी), निखील साहेबराव साठे (वय 26, रा. दळवीनगर, निगडी), आदर्श उर्फ छोट्या अशोक मगर (वय 21), अख्तर उर्फ मुन्ना जमालुद्दीन शेख (वय 20), आकाश उर्फ डच्या बसवराज दोडमनी (वय 23), अजय रणजित शेंडगे (वय 19), संघर्ष उर्फ शक्या विष्णू भालेराव (वय 20, सर्व रा. ओटास्कीम, निगडी).

पिंपरी ठाण्याच्या हद्दीतील अतुल उर्फ चाड्या अविनाश पवार (वय 28, रा. मिलिंदनगर, पिंपरी), दिनेश विलास शिंगाडे (वय 25, रा. खराळवाडी, पिंपरी).

भोसरी एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीतील पवन बंडू शिरसाठ (वय 22, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी), सचिन डनियल खलसे (वय 25, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी), रवी दिलीप गाडेकर (वय 25, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी), पवित्रसिंग जोहरसिंग भोंड (वय 30, रा. खडेवस्ती झोपडपट्टी, भोसरी), इस्तीयाक इनामुल खान (वय 25, रा. संजय गांधीनगर, मोशी) भोसरी ठाण्याच्या हद्दीतील विजय मनबहादुर थापा ( वय 22 , रा . लांडेवाडी , भोसरी ) , अभिजीत उर्फ सनी भिमराव खंडागळे ( वय 30 , रा . गुलाबनगर , दापोडी ), सचिन रामदास पवार (वय 28, रा. शांतीनगर झोपडपट्टी, भोसरी).

चिंचवड ठाण्याच्या हद्दीतील ज्ञानेश्वर दशरथ शिंदे (वय 20, रा. नागसेननगर झोपडपट्टी, चिंचवड), प्रदीप बेलाप्पा कांबळे (वय 19, रा. मोरया हौसिंग सोसायटी, चिंचवड), वशिम मुनीर शेख (वय 22, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड).

चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माधव उर्फ महादेव रोहिदास गिते (वय 25, रा. भगतवस्ती, बालाजीनगर, चाकण) अशी तडीपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांना गुरुवारी (ता. 31) दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे

Share this: