क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सहा वर्षांपूर्वी खून केलेल्या आरोपीला निगडी पोलिसांनी महाराष्ट्र – कर्नाटक राज्याच्या सीमेवर सापळा रचून केली अटक

निगडी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात सहा वर्षांपूर्वी जाणीवपूर्वक अपघात करून भावाला मारल्याच्या संशयावरून एकाने दारूच्या नशेत एकाला चाकूने भोकसले . त्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . ही घटना रविवारी ( दि . 15 ) सायंकाळी सहा वाजता ओटास्किम , निगडी येथे घडली . घटना घडल्यानंतर आरोपी कर्नाटक राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता . निगडी पोलिसांनी पाठलाग करून त्याला महाराष्ट्र – कर्नाटक राज्याच्या सीमेवरून अटक केली .

दौलत शरमुद्दीन बागवान ( वय 40 , रा . ओटास्किम , निगडी ) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे .

तर प्रकाश तुकाराम शिंगे ( वय 40 , रा.ओटास्किम , निगडी ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मयत दौलत आणि त्यांचा मित्र राहुल नाटेकर ( वय 26 ) हे दोघेजण ओटास्किम , निगडी येथे गप्पा मारत बसले होते . त्यावेळी आरोपी प्रकाश शिंगे दारू पिऊन तिथे आला . त्याने घरगुती वापराच्या चाकूने दौलत यांना भोकसले . यात दौलत गंभीर जखमी झाले . त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले . उपचार सुरु असताना दौलत यांच्या फिर्यादीवरून प्रकाश शिंगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला . या हल्ल्यात दौलत यांच्या पोटात औैर गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गुन्हा घडल्यानंतर आरोपी शिंगे पळून गेला . दौलत यांच्या मृत्यूनंतर गुन्ह्यात कलमवाढ करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला . निगडी पोलिसांनी आरोपीचा बार्शी , टेंभुर्णी , सोलापूर , अक्कलकोट या भागात शोध घेतला . तपासादरम्यान पोलीस हवालदार नागेंद्र बनसोडे , पोलीस शिपाई होनमाने यांना माहिती मिळाली की , आरोपी कर्नाटक राज्यात पळून जाण्याच्या तयारीत आहे . त्यानुसार पोलिसांनी थेट महाराष्ट्र – कर्नाटक राज्याच्या सीमेवर सापळा लावून प्रशांत शिंगे याला ताब्यात घेतले . शिंगे यांचा भाऊ मल्लेश तुकाराम शिंगे ( वय 17 ) याला सन 2014 साली मयत दौलत यांचा भाऊ दस्तगीर शमशुद्दीन बागवान याने जाणीवपूर्वक अपघात करून मारले असल्याचा राग आरोपी प्रशांत याच्या मनात होता . त्यातून त्याने हा खून केल्याचे कबूल केले . पोलिसांनी प्रशांत याला बेड्या ठोकल्या . अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत .

Share this: