दिघीकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्क्रिनींग टेस्ट’ करून ‘आर्सेनीक अल्बम-३०’ या औषधाचे मोफत वाटप

दिघी(वास्तव संघर्ष) : कोरोणा तसेच इतर आजार होऊ नये. म्हणुन… रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दिघीकर विकास प्रतिष्ठानच्यावतीने ‘स्क्रिनींग टेस्ट’ करून ‘आर्सेनीक अल्बम-३०’ या होमिओपॅथिक औषधाचे नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले. दिघीतील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौकात पाचशे नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे.

कोरोणाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहर आणि परिसरात भितीचे वातावरण आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीबरोबरंच लोकांचे मनोबल वाढले पाहिजे. हिच गोष्ट ध्यानात ठेवत, दिघीकर विकास प्रतिष्ठानच्यावतीने हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळत सॅनिटायजरचा योग्य वापर केला आहे. नागरिकांची ‘स्क्रिनींग टेस्ट’ करून त्यांना ‘अर्सेनिक अल्बम-३०’ या होमिओपॅथिक औषधाचे वितरण करण्यात आले. तसेच औषधीची मात्रा आणि पथ्य याविषयी माहिती देण्यात आली. शनिवारी सायंकाळी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौकात रहदारी तुरळक होती.

तर… नागरिकांची वर्दळ कमीच होती. दिघीकर विकास प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी साहित्याची मांडनी केली आणि एक -एक करत नागरिकांची गर्दी झाली. रांगेमध्ये लोकांना सोशल डिस्टंसींग तसेच औषधी घेण्याविषयी मार्गदर्शन केले जात होते. तर… सॅनीटायजरच्या माध्यमातून हात निर्जंतुक केले जात होते. तपासणीसह औषधे वाटली जात होती.

एखाद्या नागरिकाला काही समस्या असल्यास डॉ. राहुल पवार स्वत: समाधान करत होते. हे महत्त्वाचे होते. एरवी सामाजिक बांधिलकी जपण्याचा वसा घेतलेले दिघीकर विकास प्रतिष्ठान निरनिराळे अनेक उपक्रम राबवत आहे. तरीही या ‘आरोग्य सेवा’ देणाऱ्या यशस्वी उपक्रमाने कार्यकर्त्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे. तसेच अशा उपक्रमांची सध्या गरज आहे. असे मत नागरिकांनी व्यक्त केले. यावेळी लहान मुले, स्त्री, पुरुष तसेच जेष्ठ व्यक्ती अशा पाचशे नागरिकांनी लाभ घेतला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. यापुढेही ‘स्क्रिनींग टेस्ट’चा उपक्रम कायम राबविला जाणार आहे. असे दिघीकर विकास प्रतिष्ठानने ठरवले आहे.

याप्रसंगी मा. डॉ. राहुल पवार, मा. श्री. कैलास बोरसे, मेजर श्री. सुभाष घाडगे, मा. श्री. योगेश अकुलवार, मा. श्री. नंदकुमार तळेकर, मा. श्री. केशव वाघमारे, मा. अॅड. जितेंद्र कांबळे, मा. श्री. सतिश खरात, मा. श्री. विश्र्वास पोळ, मा. श्री. बाबुराव शिंदे, मा. श्री. संतोष जाधव, मा. श्री. पांडुरंग म्हेत्रे, मा. श्री. बाळासाहेब हगवने, मा. श्री. मुकुंद सिनकर, मा. श्री. संतोष पाटील, मा. सौ. अश्विनी कांबळे, मा. अॅड. सोनाली घाडगे, मा. अॅड. राजश्री माने, मा. सौ. गायत्री तळेकर तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. उत्तम घुगे या सर्वांनी उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Share this: