बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

डाॅन बाॅस्को आणि प्रेषित संस्थेचा अभिनव उपक्रम ;तृतीय पंथी व देहविक्रीच्या महिलांना दिला मदतीचा हात

पिंपरी (वास्तव संघर्ष) कोरोना व्हायरस या महामारीला रोखण्यासाठी प्रशासन आपल्या परिने प्रयत्न करत आहे. सरकारने 5.0 लॉकडाउनची घोषना केली आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार थप्प झाले , अनेकांच्या नोक-या गेल्या व्यवसाय थप्प झाल्याने अनेक गोरगरिबावर उपासमारीची वेळ आली आहे .अशावेळी शासनातर्फे दिली जाणारी मदत अपुरी पडत होती . समाजातील दुर्लक्षीत घटकांचेही यामुळे हाल झाले. अशावेळी पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिद्ध डाँन बाँस्को आणि प्रेषित सोशल फाउंडेशन संस्थेच्या वतिने दुर्लक्षीत घटकांची दाद घेत मदतीचा हात पुढे करत अन्नधान्याचे वाटप केले आहे .

तृतीय पंथी, देहविक्रीचा व्यवसाय करणा-यांवरही उपासमारीची वेळ आली, त्यांच्या मदतीला डाँन बाँस्को व प्रेषित सोशल फाउंडेशनने मदतीचा हात देत अन्न धाण्याचे वाटप केल्याने या घटकांमधुन आनंदाचे वातावरण निर्माण होउन सर्वांनी या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.

या अभिनव उपक्रमात सर्व आधिकारीवर्ग मा. फादर लेस्टर फर्नांनडिस, फादर संजय लोपीस, ब्रदर दामोदर वानखेडे, फादर राॅलविन, यांच्या मार्गदर्शणाखाली श्री सचिन औचरे सौ स्मिता औचरे आनंद बनसोडे,मार्गारेट पाळंदे, मेरी पिटर,अंजला पिटर,नितीन गजभीवे,सुशिल शिंगाडे,(अटाॅस सिंटेल)व श्री सॅमसन गायकवाड यांचे सहकार्य लाभले. उपस्थित कार्यक्रमात प्रेषित सोशल फाऊंडेशनचे सचिन औचारे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

Share this: