क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सोशलमिडीयावर भारतीय संविधानाबद्दल अपशब्द करणं भोवलं ;आरोपीला सांगवी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सांगवी (वास्तव संघर्ष) :इट्राग्राम या सोशलमिडीयावर लाईव्ह येऊन भारतीय संविधानाबद्दल अपशब्द बोलणा-या एका समाजकंटकाला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत . ही घटना बुधवारी (दि.26) रोजी घडली होती. याबाबत शुक्रवारी (दि.28) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय म्हसे (रा.पवनानगर जुनी सांगवी पिंपरी चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत बाळू मोहन शेंडगे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री बाराच्या सुमारास आरोपी अक्षय म्हसे याने इट्राग्राम या सोशलमिडीयावर लाईव्ह चालू असलेल्या काॅलवर भारतीय संविधानाचा अवमान आणि भारतीय संविधानाला विरोध करणारे संभाषण केले. यामध्ये तो म्हणाला मी संविधान मानत नाही माझा संविधानाला विरोध आहे, काय उपटायचे उपटा, जे होईल एकदाच होईल असे बोलून संविधानाबद्दल अश्लिल शिवीगाळ केली. हे संभाषण सामाजिक कार्यकर्ते शिशुपाल साळवे यांनी पाहीले असता त्यांनी सदर बाब फिर्यादी बाळू शेंडगे यांच्या निदर्शनास आणून दिली. फिर्यादी बाळू शेंडगे यांनी आरोपी अक्षय म्हसे याचे वक्तव्य संविधान विरोधी असून संविधानाबद्दल खरी श्रद्धा आणि निष्ठा दिसून न आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

Share this: