बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज भरण्याची 27 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

पिंपरी ( वास्तव संघर्ष) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठीची अंतीम मुदत 12 ऑगस्ट रोजी संपुष्टात आली होती. सर्वसामान्य नागरिकांना अर्ज सादर करताना द्यावयाच्या कागदपत्रांसाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे या योजनेंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी महापालिकेने ऑनलाईन अर्ज नोंदणीची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी व पिंपरी येथे योजना राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पाकरिता अर्ज ऑनलाईन भरुन घेण्यासाठी (दि.28) जून रोजी जाहीर प्रकटनाद्वारे मुदत देण्यात आलेली होती मात्र पालिकेने एकदा 12 ऑगस्ट आणि आता 27 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ केली आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांपैकी अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला इ. कागदपत्रे मिळण्यासाठी नागरीकांना विलंब लागत होता. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे,

Share this: