क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

योगेश जगताप खून प्रकरणातील मुख्य आरोपींना पोलिसांनी केली अटक

पिंपरी(वास्तव संघर्ष ): सांगवी, पिंपळे गुरव मधील काटेपुरम चौकात भर दिवसा एका सराईत गुन्हेगाराचा गोळ्या घालून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपींना पकडायला गेलेल्या पिंपरी चिंचवडच्या पोलीस पथकावर आरोपींनी दोन गोळ्या झाडल्या. तर  पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हा प्रकार रविवारी रात्री आकाराच्या सुमारास चाकण येथील कोये, कुरकुंडी गावच्या हद्दीत घडला. .

सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गणेश हनुमंत मोटे 23, रा. सांगवी), अश्विन आनंदराव चव्हाण (23, रा. सांगवी) आणि महेश तुकाराम माने (23, रा. कवडेनगर, सांगवी) या तिघांना अटक केली आहे.

योगेश जगताप खून प्रकरणातील आरोपी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोये, कुरकुंडी येथे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर, सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील टोणपे, डीबीचे प्रमुख सहायक निरीक्षक सतीश कांबळे, गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक हरीश माने यांची चार पोलीस पथके रवाना झाली. स्वतः पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हेही पोहचले.

शेतातील झाडाझुडपात आरोपी लपून बसलेले दिसले. त्यावेळी पोलिसांना पाहताच मोटे आणि माने या दोन आरोपीनी त्यांच्याकडील पिस्तुलातुन पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. त्यावेळी पोलीस निरीक्षक टोणपे आणि सहायक पोलिस निरीक्षक कांबळे यांनी आरोपींच्या दिशेने फायरिंग केले. या सर्व थरारामध्ये अनेक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. याचवेळी आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तेथील झाड आरोपींच्या दिशेने फेकले. यामुळे आरोपी खाली पडले आणि पोलिसांनी त्यांना पकडले. अधिक तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Share this: