क्राईम बातम्यामहाराष्ट्र

रूग्णालयात स्ट्रेचर न मिळाल्याने नवजात बालकाचा फरशीवर पडून दुर्दैवी मृत्यू

वास्तव संघर्ष औरंगाबाद–मधील घाटी रुग्णालयात एका गरोदर महिलेला स्ट्रेचर न मिळाल्याने चालतच लिफ्टपर्यंत जावे लागले. या दरम्यान लिफ्टजवळच महिलेची प्रसूती झाली आणि नवजात बालक फरशीवर पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला..

या घटनेने घाटी रुग्णालयातील दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. संतापजनक बाब म्हणजे रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणात जबाबदारी झटकून त्या मातेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले..सोनाली खाटमोडे असे या मातेचे नाव असून त्या छावणी परिसरात राहतात.

दरम्यान घाटी रुग्णालयातील अधीक्षक डॉ. कैलाश झिने यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, या प्रकरणात आम्ही कागदपत्रांची पूर्तता न करता आधी महिला रुग्णाला उपचारासाठी दाखल करुन घेतले होते. बऱ्याचदा स्ट्रेचर उपलब्ध असतात. एखाद्या वेळी कर्मचारी दुसऱ्या रुग्णाला घेऊन गेलेले असतील नातेवाईक आणि रुग्ण कधी कधी पायीच जातात. या घटनेतही नातेवाईकांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला. लिफ्टजवळ महिलेची प्रसूती झाली आणि ती खाली बसली. स्ट्रेचर नसल्याने बाळाचा मृत्यू झाला असे म्हणणे योग्य ठरणार नाही. कधी कधी प्रसूती दरम्यानही बाळाचा मृत्यू होऊ शकते, असे उत्तर देत झिने यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

Share this: