महिला वकिलाच्या ऑफिसची तोडफोड;वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वाकड (वास्तव संघर्ष) : काळेवाडीतील एका महिला वकिलाच्या ऑफिसची तोडफोड करुन त्या ऑफिसमधील तब्बल अठ्ठेचाळीस हजार सातशे रुपयांचे सामान चोरी केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार रविवारी (दि.18)रोजी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला आहे.
याबाबत अॅड. सोफिया जाॅर्ज डिसोझा यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
उमेश गुंड नानू कुट्टन,शशिकांत मुगली व त्यांचे इतर साथीदार (सर्व राहणार -अम्रृतधाम सोसायटी विजयनगर काळेवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड. सोफिया डिसोझा यांचे ऑफिस शॉप नं 3, सत्संग भवन जवळ, अमृतधाम सोसायटी, विजयनगर, काळेवाडी येथे आहे. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या ऑफिसच्या शेजारील क्लासिक सलुनचे मालक मोहन शिंदे यांनी फोन करून सांगितले की,ऑफिसचे बाहेरील ग्रील कोणीतरी तोडुन त्याचे नुकसान करून ग्रीलचे आतमध्ये ठेवलेले लोखंडी टेबल, खुर्ची, लोखंडी बेंच, प्रिंटर व बोर्ड असे साहित्य नेले आहे. त्यामुळे त्यांनी सदर प्रकाराबाबत माहिती घेतली असता अमृतधाम सोसायटी मध्ये राहणारे उमेश गुंड,नानू कुट्टन, शशीकांत मुगली व त्यांचे इतर साथीदारांनी त्यांचे सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती टाकली की”शॉप नं 3 से बाहेर लावलेले बेकादेशीर चील हे आम्ही काढून टाकले आहे” असा मेसेज त्यांचे गुपवर टाकला. गाव सोसायटीच्या ग्रुपवर त्यांचे वडील असलेने त्यांना ही समजलेने त्यांनी लगेच ही बाब सोफिया यांना कळविली.
त्यामुळे फिर्यादी सोफिया यांना खात्री झाली की, दि. 17/06/2023 रोजी रात्री 10/00 वा बंद केलेले आमचे ऑफिस आज दि. 18/06/2023 रोजी सकाळी 10/00 वा चे दरम्यान बंद असताना अमृतधाम सोसायटी मध्ये राहणारे उमेश गुंड,नानु कुड़न, शशीकांत मुगली व त्यांचे इतर साथीदारांनी संगनमत करुन आमचे ऑफिसचे बाहेर असलेले लोखंडी पॉल कशाने तरी कापुन आतमध्ये अनाधिकाराने प्रवेश करून शटर व सीलवे मध्ये ठेवलेले लोखंडी टेबल, लोखंडी बेंच, लोखंडी खुर्ची व कैनोन कंपनीचा एक प्रिंटर एकूण साहित्याची किंमत 45.700 रुपये असे साहित्य त्यांच्या संमतीशिवाय चोरुन नेले आहे. याबाबत अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.