खुशखबरःपीएमआरडीए करणार 120 दुकानांचे ई-लिलाव
पिंपरी(वास्तव संघर्ष) : पेठ क्रमांक 12 येथे पुणे महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील घरांसाठी नागरिकांना टप्प्याटप्याने घराचा ताबा देण्यात येत आहे. पीएमआरडीएने पेठ क्रमांक 12 येथे ईडब्ल्यूएस गटासाठी 3 हजार 317 सदनिका तर, एलआयजी गटासाठी 1 हजार 566 सदनिका अशा एकूण 4 हजार 883 सदनिकांचा गृहप्रकल्प साकारला आहे.
या सदनिकांची सोडत पद्धतीने विक्री करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) भोसरी पेठ क्र.12 परिसरातील 120 दुकानांचा ई-लिलाव करणार आहे.120 दुकाने निवासी योजना क्र.12 भोसरी पेठेत, 4,800 निवासस्थाने आहेत. तेथे 120 ही दुकाने 80 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देण्याची नोंदणी सुरू झाली आहे.
या ई-लिलावामध्ये किमान 10.36 चौरस मीटर आणि जास्तीत जास्त 23.09 चौरस मीटर क्षेत्रफळाची दुकाने उपलब्ध असतील. नोंदणी आणि अर्ज डाउनलोड करण्याची प्रक्रिया सुरू 12 जुलै 2023 संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत खुले राहील. इच्छुक लोक खालील वेबसाइटवर नोंदणी करू शकतात: https://eauction.gov.in. ई-लिलाव प्रक्रिया 10 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल.