क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

ओटास्कीम निगडीत रस्ता बंद केला म्हणून तरूणावर कोयत्याने हल्ला;निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष )-पिंपरी चिंचवडच्या निगडीतील रुपीनगर परिसरात कोरोना व्हायरस चे तब्बल 15 रुग्ण आढळून आले आहेत. याच करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील अनेक भागात सिल केले आहे. रस्ता बंद केल्याच्या कारणावरून अकरा जणांच्या टोळक्‍याने एका तरुणावर कोयता आणि तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना निगडी येथील ओटास्कीम येथे घडली.

विजू साळवे असे टोळक्‍याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून रोहित रामदास ताटे (वय 24, रा. भीमशक्‍ती, चौक, निगडी) यांनी रविवारी (दि. 26) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी संपत घागरमळे, दिलीप दगळगे, अभिजित मांजरे, सुनील कांबळे, अक्षय वावळे, अशोक वावळे, आकाश वावळे, अजय वावळे, तीक मांजरे, रवी साठे, अवि अवचार (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडीतील ओटास्कीम परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने फिर्यादी रोहित ताटे यांचा आतेभाऊ अजय साळवे यांनी त्यांच्या गल्लीत येणारा रस्ता बंद केला. या कारणावरून आरोपी संपत घागरमळे, दिलीप दगळगे, सुनील कांबळे आणि तीक मांजरे यांनी शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अजय साळवे यांच्याशी वाद घातला.

त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास आरोपी आपसांत संगनमत करून सावळे यांच्याशी भांडण करण्यासाठी आले. त्यावेळी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या फिर्यादी रोहित ताटे, त्याचा आत्याचा मुलगा विजू साळवे, फिर्यादी यांची आई नीता ताटे , आत्या सिंधू साळवे, वहिनी चंदा साळवे, शेजारील प्रशांत सूर्यवंशी यांना मारहाण केली. तसेच विजू साळवे यांच्यावर तलवार व कोयत्याने वार करीत गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. ओहोळ याबाबत अधिक तपास करीत आहेत

Share this: