आरोग्यमाझं पिंपरी -चिंचवड

रूपीनगरकरांची चिंता वाढली..! आणखी तीन जण कोरोना पाॅझिटिव्ह ;आत्तापर्यंत निगडीतील एकूण १५ रूग्ण कोरोनाग्रस्त

पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवड शहरातील निगडी – रुपीनगर परिसरात दिवसेंदिवस कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आज दि. 27 एप्रिल रोजी दोन पुरुष आणि एका महिलेचे असे तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत . त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे . निगडी रुपीनगर परिसरात आजपर्यंत एकुण 15 रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत .

पिंपरी चिंचवड महापालिकेने रविवारी दि . 26 एप्रिल रोजी 116 जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते . त्याचे रिपोर्ट आज 27 एप्रिलला आले . त्यामध्ये रुपीनगर परिसरातील रहिवाशी असलेल्या वय 28 , 26 वर्षीय दोन पुरुषांचे आणि 25 वर्षाच्या एका महिलेचे असे तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत . हायरिस्क कॉन्टॅक्टमधून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे .येथेच 24 एप्रिल रोजी एकचदिवशी रुपीनगर परिसरातील तब्बल 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते . 23 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आलेल्या एका रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधून 11 जणांना कोरोनाची लागण झाली होती .

दरम्यान, शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 61 वर पोहचला आहे . आजपर्यंत 89 जणांना कोरोनाची लागण झाली आहे . तर , 28 जण कोरोनामुक्त झाले असून चौघांचा मृत्यू झाला आहे .

Share this: