बातम्यामहाराष्ट्र

हे कुठलं सोमटं आलंय, ‘ये बारामतीमध्ये बघतोच तुला-अजित पवार

जळगाव (वास्तव संघर्ष) :भाजप पक्षाने जबाबदारी दिल्यास शरद पवारांची बारामतीदेखील जिंकवून दाखवू, असे विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. महाजन यांच्या या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी शुक्रवारी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.

त्यांनी यावेळी भाजपचे नेते आणि राज्यांचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्यावर पलटवार करत म्हणाले ‘ये बारामतीमध्ये बघतोच तुला ५०- ५० वर्ष इथले लोक मला व माझ्या चुलत्यांना निवडून देत आहेत आणि हे कुठलं सोमटं आलंय, अशा शब्दात अजित पवारांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.

जळगाव जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांची नाडी ओळखणारे तुमचे आमचे नेते शरद पवार कृषी मंत्री असते तर आज शेतकऱ्यांची वाईट अवस्था झाली नसती. शरद पवारांनी ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली आणि आज किती लोकांना कर्जमाफी मिळाली असा सवाल त्यांनी विचारला.

लोकांना फसवले जात असून त्यांना गाजरं दाखवली जात आहेत. खासगी आयुष्यावर गदा आणली जात आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर हा हल्ला आहे. इंग्रजांच्या पारतंत्र्यापेक्षा फार गंभीर पारतंत्र्य या सरकारच्या काळात सुरु असून त्यासाठी परिवर्तन झालेच पाहिजे, हे सरकार गेलेच पाहिजे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Share this: