माझं पिंपरी -चिंचवड

दापोडी पुर्नवसन प्रकल्पास विरोध, पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन

पिंपरी-येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पुतळ्याजवळ दापोडी झोपडपट्टी घरांचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुर्नवसन प्रकल्पास विरोध करण्यासाठी आज (शनिवार) रोजी आंदोलन करण्यात आले.

दापोडीतील जयभीमनगर, लिंबारे वस्ती, सिध्दार्थनगर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुर्नवसन प्रकल्प होणार आहे. प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला. वर्षानुवर्ष स्वतःच्या नावावर घरपट्टी आणि सातबारा असलेल्या जयभीमनगर च्या उताऱ्यावर झोपडपट्टीचे आरक्षण टाकून पुर्नवसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात जाणूनबुजून फसवणूक केल्याचा आरोप दापोडी येथील रहिवाश्यांनी केला आहे. शासनाने आमचा विश्वासात केला आहे असेही नागरिक म्हणाले.

घरमालकांच्या एक ते चार गुठ्यांच्या जागेपेक्षा जास्त मालकी हक्क असून यावर अनेक रहिवाशांची दुमजली घरे आहेत. त्यांना सरकारकडून केवळ २६९ चौ. फूट असलेली घरे देऊन विकासाच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट करण्यात येत आहे त्यामुळे दापोडीकरांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुर्नवसन प्रकल्पास विरोध दर्शविला आहे.

दरम्यान, दापोडीतील पुनर्वसन प्रकल्पास विरोध दर्शविण्यासाठी रहिवाशांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रवेशद्वाराजवळ हजारोंच्या संख्येने ठीय्या आंदोलन करत पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.

Share this: